महामारी पूर्वनियोजित? खरा उद्देश- सक्तीचे लसीकरण, डीपॉप्युलेशन अजेंडा..!


FREEDOM, मराठी / Sunday, May 23rd, 2021

श्रीकांत भिमराव पाटील, जळगाव
(षडयंत्र सिद्धांतांचे अभ्यासक)

धर्मभोळ्या लोकांचा तथाकथित देव सैतानापुढे हतबल आहे की काय अशी जगाची विचित्र अवस्था होऊन बसलीय. जगाच्या भवितव्याचा प्रवास Survival of the fittest कडून Survival of the richest कडे होतोय. अमेरिका व युरोपमध्ये १८व्या व त्यानंतरच्या शतकात उदयास आलेले कार्पोरेट आणि इन्वेस्टमेन्ट बॅन्कर घराणे जसे रॉथ्सचाईल्ड, रॉकफेलर, मॉर्गन, गोल्डमन सॅक्स इ. कुटुंबांकडे जगाचा अनभिषिक्त ताबा आहे, हे पचायला थोडे जड जाईल पण दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. जगाची आगामी वाटचाल व त्याचे धोरण ठरवणारी ही मंडळी पृथ्वीवरील सर्व साधनसंपत्ती साम-दाम-दंड-भेद या सर्व तत्त्वांचा हवा तसा उपयोग करून स्वमालकीची करण्याच्या मागावर आहेत आणि यांचा हा दृष्टिकोन अलीकडचा नसून गेल्या तब्बल ३००-३५० वर्षांपासून ते यादृष्टीने आखणी करत आहेत व आपले दलाल जगातल्या महासत्ता असणाऱ्या देशांपासून ते छोट्या देशांमध्ये पेरून ठेवत आपले इप्सित साध्य करत आहेत. सैतानाला मानणारे हे बडे लोक आपल्या अनैतिक संस्कार व रीतीरिवाजाच्या मदतीने तसेच इल्युमिनाटी, हायड्रा, फ्रीमेसनरी, क्लब ऑफ ३००, नाईट टेम्पलर, बिल्डरबर्ग ग्रुप अशा अनेक ज्ञात-अज्ञात सिक्रेट सोसायटीजच्या माध्यमातून जगावरील आपले पाशवी नियंत्रण आणखी घट्ट करत गेले आहेत. जगातील प्रतिष्ठित उद्योजक, श्रीमंत व्यक्ती, सेलिब्रेटीज, डॉक्टर, राजकारणी, नोकरशहा, वकील, अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विचारवंत, तत्त्वज्ञ इ. अशा प्रत्येक क्षेत्रातील आघाडीच्या लोकांना हाताशी धरून; ‘उजवे’ व ‘डावे’ अशा दोन्ही बाजूच्या विचारवंतांना जराही कळू न देता, आपल्या स्वार्थाप्रमाणे त्यांना मॅनेज करून; प्रसंगी त्यांना ‘विकत’ घेऊन स्वतः मात्र पडद्याआडून नेपथ्य करणारे व जगातील जवळपास सर्व धोरणांची सूत्रे हलवणारे हे अतिशक्तिशाली, धनाढ्य, कावेबाज व अत्यंत धूर्त असे मूठभर लोक जगातील गेल्या शेकडो वर्षांत घडलेल्या अनेक लहान-मोठ्या घटनांचे कारण आहेत. सर्व क्षेत्रातील बहुसंख्य विचारवंतांना हे अजिबात पटणार नाही (कारण नवीन ज्ञान सहजासहजी स्वीकारू नये हे मूळ व खूळ आपल्या शिक्षणव्यवस्थेनेच आपल्या अंगी बाणवले आहे), पण या घटनांचे विविध पैलू उलगडतांना जसे बारकावे उसवत जातात व अनेक बिंदू जुळत जातात; तसतशी आपली धारणा पक्की होत जाते की आपण आतापर्यंत ज्या दृष्टीने जग बघत आलो, विविध जागतिक वा स्थानिक घडामोडींची पार्श्वभूमी प्रसारमाध्यमांतून बघत-ऐकत आलो, ते मुलामा दिलेलं होतं. खरं सत्य वेगळंच आहे. त्यालाही वस्तुस्थितीचे अनेक पदर आहेत. प्रस्थापित व्यवस्थेचा आपल्याकडून ‘फायदा’ व्हावा, म्हणून खरं सत्य कळू न देता उपयुक्ततावादी शिक्षण देत राहणं हे आजच्या बाजारू शिक्षणपद्धतीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग अशा प्रकारे केलं गेलं आहे की जे दिसतं त्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, आणि हीच बाब आपली कायम घात करत आली आहे. ही घराणी जगातील साधनसंपत्तीच्या काटकसरीबाबत विविध धोरणे ठरवीत असतात. आपल्या उद्योग-साम्राज्यांच्या सामाजिक सेवा संस्थांच्या माध्यमातून, आपल्या कार्याला philanthropy हे गोंडस नाव देवून नेमके मानवताविरोधी काम करतात. मुळात त्यांना मानवतेसाठी काही करायचेच नाहीये. ही बेसुमार वाढलेली लोकसंख्या (जिचा प्रचार त्यांनी आपल्यावर थोपवण्यात आलेल्या अनेक माध्यमांतून वेळोवेळी केला आहे) ज्या साधनसंपत्तीचा अमर्याद वापर करीत आहे, त्यावर आपले कायमस्वरूपी प्रभुत्व मिळवण्यासाठी हे कारस्थानवादी प्रयत्नशील आहेत. त्यांचं नियोजन व अंमलबजावणी ते इतक्या गुप्त प्रकारे पार पाडत असतात की सामान्य माणसाला त्याचा मागमूसही राहत नाही कारण जगातील जवळपास सर्व प्रसारमाध्यमे त्यांच्या मालकीची नाहीतर प्रभावाखाली आहेत. या लेखात आपण बघणार आहोत की महामारी खरंच नैसर्गिक कारणांनी येते की हा एकप्रकारे घातपात असावा. षडयंत्र सिद्धांत हे अशाप्रकारे काम करतात की वरवर पूर्णतः काल्पनिक भासणाऱ्या अनेक घटनांचे एकमेकांशी अशाप्रकारे लागेबांधे असतात की ते बघून आपण थक्क होतो. अशाच निवडक बिंदूंचा आपण कोरोना महामारीमधील सहभाग बघणार आहोत.

प्रिन्स फिलीप, ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांचे धक्कादायक वक्तव्य:

ब्रिटीश राजघराण्याचे सदस्य व ब्रिटनची राणी एलिझाबेथ II यांचे पती प्रिन्स फिलीप (99) यांचे यावर्षी ९ एप्रिलला निधन झाले. नेहमी आपल्या खुमासदार शैलीत विनोद करण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रिन्स फिलीप यांचे एक वक्तव्य त्यांच्या मृत्यूनंतर अचानक प्रसिद्ध झाले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण व संशयास्पद वाटते. 1988 मध्ये डच प्रेस एजन्सीशी बोलतांना प्रिन्स फिलीप म्हटले होते, ‘’माझा पुनर्जन्म झाला तर पृथ्वीवरील बेसुमार लोकसंख्येवर उपाय म्हणून मला एक जीवघेणा विषाणू बनून यायला आवडेल.” 1 कोरोना महामारी ही खरोखर महामारी आहे आणि ती अचानक उद्भवली आहे याबद्दल या वक्तव्यामुळे शंका निर्माण होते. कोरोनासारख्या जागतिक महामारी या सुनियोजितच आहेत. त्यासाठी थेट चीनला जबाबदार धरले जाते, पण ते तितके संयुक्तिक वाटत नाही. कोरोना व्हायरसच्या उगमाचे काहीतरी कारण म्हणून चीनला पुढे केले गेले. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्पष्ट होते की जगाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर निरंकुश ताबा असण्यासाठी लोकसंख्यावाढ ही मोठी आडकाठी आहे आणि विषाणू ‘तयार’ करून पसरवला तर लोकसंख्या आटोक्यात येईल या त्यांच्या तर्काला पुष्टी मिळते. कोरोना ही जगातील पहिलीच महामारी नाही, यापूर्वीही अनेक महामारींनी जगात हाहाकार माजवला आहे. महामारीचा धसका घेऊन असेच लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. महामारीसारख्या जागतिक आपत्तींना अनेक पदर असतात. लोकसंख्या नियंत्रण या मुख्य उद्दिष्टाशिवाय ‘माइंड कंट्रोल टेक्निक’ म्हणूनही याचा त्यांना फायदा घेता येतो. प्रसारमाध्यमांचा अनैतिक वापर करून सततपणे सरकार उपचाराबाबत कसं अपयशी ठरतंय, वैद्यकीय यंत्रणा कशी हतबल आहे, पोलीस यंत्रणा लॉकडाऊन व कर्फ्यूचे कशाप्रकारे नियमन करतेय, कोरोनाबाधित व मृत्यूंचे खोटे आकडे दाखवणे, लसीकरणामुळे झालेले मृत्यूंचे आकडे न दाखवणे, फक्त नकारात्मक दाखवत राहणे या सर्व ‘ब्रेकिंग स्टोरीज’चा प्रेक्षकांवर दिवसभर मारा करणे व गोंधळाचे, भीतीदायक वातावरण तयार करत राहणे व त्याच धास्तीने लोकांचा मृत्यू होणे व पुन्हा त्या मृत्यूंचे आकडे अतिशयोक्तीने सांगणे हेच सुरु आहे. पण जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा वक्तव्याची नक्कीच अपेक्षा नाही. ‘एक्स्प्रेस’ने त्यांच्या या कृतीला मात्र मजेशीर वक्तव्य वा बोलण्यातली चूक असं म्हटलंय..! प्रत्यक्षात हे गंभीर आहे.

कोणत्याही वैद्यकीय शिक्षणाची पार्श्वभूमी नसलेले बिल गेट्स महामारीच्या केंद्रस्थानी:

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध करणाऱ्या अमेरिकन बिझनेस मॅगझिन ‘फोर्ब्स’मध्ये 21 नोव्हेंबर 2011 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर ‘जगातील सर्वांत सामर्थ्यशाली 70 लोकां’च्या यादीत विल्यम हेन्री गेट्स III यांचे छायाचित्र छापून आले होते. 2 ज्यांना ‘बिल’ या टोपणनावाने ओळखले जाते. मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून ओळख असलेले बिल गेट्स, कोणतेही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसूनही ‘जगातील सर्वांत सामर्थ्यवान डॉक्टर’ म्हणून ओळखले जातात.(3,4) हे मुद्दाम घडवून आणलेय असं तर नाही? कारण महामारीचं नाव घेतलं की बिल गेट्स लगेच समोर झळकतात. इतका यांचा घनिष्ठ संबंध आहे. गेल्या दशकापासून बिल गेट्स हे जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे दुसरे सर्वांत मोठे देणगीदार बनले आहेत. 5 (P) विविध महामारींचा उद्रेक व त्यावर उपाय म्हणून गरीब राष्ट्रांना आर्थिक मदत (?) पुरवणे या दृष्टीने WHO ला देणगी देणे यात ‘देणगी’ हा पुन्हा गोंडस शब्द आहे, खरं तर ही गुंतवणूक आहे एका विशिष्ट ध्येयासाठी केलेली! प्रत्यक्षात, बिल गेट्स हे त्या आर्थिक साम्राज्य-घराण्यांचे बाहुले व प्रतिनिधी आहेत, ज्यांच्या ‘डीपॉप्युलेशन अजेंडा’साठी ते WHO सोबत मिळून आरोग्यदायी (?) कोव्हिड लस तयार करत आहेत. जगाचे भवितव्य ठरवणाऱ्या आरोग्य धोरणासंबंधी निर्णय जेव्हा एखाद्या उद्योजकाच्या प्रभावाखाली घेतले जातात, तेव्हा तिथे देणगी म्हणजे ‘पैश्या’चे महत्त्व अधोरेखित होते, पण खरंतर जगातील (खरेखुरे) तज्ज्ञ डॉक्टर व शास्त्रज्ञांच्या टीमने या धोरणांच्या केंद्रस्थानी असायला हवे होते. यामुळेच स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा येथील एका स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी म्हणतात, “जागतिक आरोग्याच्या बाबतीत बिल गेट्स हे जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्तींपैकी आहेत, कारण त्यांना- केवळ WHOच्या बाबतीतच नव्हे तर- G20 देशांच्या समूहाचे प्रमुख म्हणूनही मानले जाते.” 6 (या G20 समूहामध्ये भारतही आहे.) हे सर्व जागतिक षडयंत्रकारींच्या आशीर्वादानेच घडून येत असेल. त्यांच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागाशिवाय जगातील कोणतीही मोठी घटना घडून येत नाही. पण प्रसारमाध्यमांमध्ये ती अशाप्रकारे प्रस्तुत केली जाते की प्रेक्षकांच्या मनात ती गोंधळाच्या एका परिस्थितीतून दुसरीकडे सतत हेलकावे खात राहते आणि नेमके असे काहीच दृष्टीपथात येत नाही. तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असा, आजची प्रसारमाध्यमे ही फक्त ‘प्रचारमाध्यमे’ झाली आहेत. चुकीच्या माहितीचा सतत प्रचार करणे व काहीही सकारात्मक बातमी न देता प्रेक्षकांची डोकी स्पॅम करत राहणे हेच त्यांचे एकमेव ध्येय आहे. त्यासाठी त्यांना व्यवस्थित ‘मॅनेज’ केलेलं असतं..! जगातली सर्व प्रमुख मीडिया हाऊसेस ही बलशाली कॉर्पोरेट घराण्यांच्या आधिपत्याखाली आहेत आणि सध्याच्या काळात कोरोना महामारीचे ते जे भीषण चित्र रंगवत आहेत (वस्तुस्थिती पूर्णपणे उलट आहे.), त्यामागे ‘माइंड कंट्रोल’ हे एकमेव त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यात ते पूर्णपणे सफल झाले आहेत. कोरोना महामारी हा केवळ मीडिया इव्हेंट आहे. स्वतःला महासत्ता व विश्वगुरु म्हणवून घेणाऱ्या आपल्या देशात फार थोड्या लोकांना याची कल्पना आहे, त्यातल्या बहुतांश लोकांना उलट आपली पोळी भाजून घ्यायची आहे म्हणून ते चूप आहेत. अमेरिका व युरोपमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरून रोज आंदोलने करीत आहेत. मे २०२१ च्या पहिल्या पंधरवड्यात लॉकडाऊनच्या विरोधात हजारो लोकांनी लंडनमध्ये बीबीसी या जगप्रसिद्ध मीडिया हाउसच्या मुख्यालयावर मोर्चा काढला व ‘shame on you’च्या घोषणा दिल्या. 7 लोकांच्या हातात फलक होते- त्यावर लिहिले होते, BBC Fake News! जॉर्ज ऑरवेल यांच्या ‘1984’ या लोकप्रिय कादंबरीतील War is peace, freedom is slavery, ignorance is strength या ओळी त्यावर उद्धृत केलेल्या होत्या. आपण भारतीय मात्र गाढ झोपेत आहोत आणि इथली प्रसारमाध्यमे जे दाखवत आहेत ते खरं मानून त्याचं आंधळेपणाने समर्थन करीत आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत खुलेआम ‘न्यू वर्ल्ड ऑर्डर’च्या स्वागताचे सूतोवाच करीत आहेत. 8 कायम इतिहासात जगणारे, संस्कृतीचे गोडवे गाणारे आपले भारतीय नागरिक या अमेरिकन व युरोपिअन नागरिकांसारखे आपल्या हक्कांसाठी, स्वातंत्र्यासाठी कधी जागरूक होणार?

‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाच्या 2011 च्या एका लेखात मॅथ्यू हर्पर (स्टाफ मेंबर) यांनी बिल गेट्स यांच्या कुटुंब नियोजनासंबंधी धोरणाची विस्तृत माहिती दिली आहे. १९९७ मध्ये बिल गेट्स व मेलिंडा गेट्स (तेव्हा फाउंडेशनची सुरवात व्हायची होती) हे सामाजिक आरोग्य क्षेत्रात उतरले, तेव्हा ‘विकसनशील देशां’तील स्त्रियांनी संततिनियमन समजून घ्यावे या उद्देशाने संगणकाचा वापर करण्यासाठी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीला अर्थपुरवठा केला. हे करण्यामागे बिल गेट्स यांचा कुटील उद्देश इथे समजून घ्यायला हवा. हे अतिश्रीमंत लोक कशाप्रकारे आपल्या विचारांना अमलात आणण्यासाठी जगाच्या गळी उतरवतात हे फार मजेशीर व तितकेच भीतीदायक आहे. बिल यांचा तर्क असा होता की आरोग्य = साधनसंपत्ती ÷ माणसे..! म्हणजे नैसर्गिक व मानवी साधनसंपत्तीचा चांगला उपयोग करून घ्यायचा असेल तर माणसे मारून आरोग्य सुधारणे आणि त्याहून क्रूर व खरा अर्थ असा, आरोग्य व्यवस्थेचे खच्चीकरण करून माणसे मारणे व साधनसंपत्तीवर कब्जा करणे..! लसीचा त्यांच्या दृष्टीकोनातून काहीही उपयोग नव्हता. “जिथे उपासमार व कुपोषणाचा किंवा देशांतर्गत यादवी युद्धांचा धोका आहे अशा ‘दाट लोकसंख्या’ असणाऱ्या देशांत मुलांचे जीवन वाचवून काय फायदा?” बिल यांच्या या दुष्ट तर्काचा अचूक दुष्परिणाम आपण आज बघत आहोत, जे आपल्या आजूबाजूला घडतंय. कोरोनाच्या नावाखाली हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची हेळसांड केली जात आहे. रोज हजारो रुग्णांचा (वेगळ्याच कारणांनी) मृत्यू होत आहे आणि ते कोरोनाचे अवास्तव स्तोम माजवण्यासाठी वापरले जात आहे. अगोदर बिल गेट्स यांना लसीकरणाचे संशोधन व निर्मिती व्हावी यात रस नव्हता. पण अचानक त्यांच्यातली माणुसकी जीवंत झाली का? आपल्या त्या भूमिकेत अचानक गिरकी घेत बिल गेट्स यांनी बदल केला. “जन्मदर रोखण्यापेक्षा ज्या मुलांचा आधीच जन्म झालेला आहे, त्यांना ‘वाचवण्यासाठी’ आम्ही प्रयत्न करू. आता आम्ही लसीकरणाकडे वळत आहोत.” मुलांना वाचवण्यासाठी आरोग्य व्यवस्थेचीही मदत घेता आली असती, पण त्यासाठी सर्वांत स्वस्त ‘हत्यार’ म्हणजे लस..! बिल गेट्स व मेलिंडा गेट्स यांच्या अगोदर २०व्या शतकात अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत व जगातील दुसरे सर्वांत बलाढ्य उद्योग साम्राज्य-घराणे रॉकफेलर यांच्या ‘रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च’ने विषाणूशास्त्रात लसीचे महत्त्व याकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. 9 याचा अर्थ, लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी मुळात लसीचा शोध लावला आणि आरोग्य सुविधेचा त्याला मुलामा दिला गेला. लहान मुले, गर्भवती महिला व गंभीर आजार असणारे रुग्ण यांच्यावर लसीचा प्रयोग करू नये असं अमेरिकेच्या FDAने (EUA: Emergency Use Authorization) त्याचप्रमाणे भारताच्या ‘मिनिस्ट्री ऑफ हेल्थ व फॅमिली वेल्फेअर’ने स्पष्ट केलेले असूनही भारतात टीव्हीवरून लसीचा सर्रास प्रचार केला जात आहे व न्यूज चॅनेलच्या ‘प्राईम टाईम’मध्ये विविध तज्ज्ञांमार्फत जनतेची दिशाभूल केली जात आहे. सरसकट लसीकरणाची सक्ती केली जात आहे. हे गंभीर व निंदनीय आहे.

बिल गेट्स यांची मार्च २०१५ मध्ये संभाव्य महामारीबद्दल भविष्यवाणी:

सन 1984 मध्ये अमेरिकेत सुरु झालेला व तिथून टेड-एक्स या नावाने जगभरात लोकप्रिय झालेला टॉक शो म्हणजे ‘टेड’. Technology, Entertainment & Design या शब्दांचे संक्षिप्त रूप. याठिकाणी बिल गेट्स यांच्या ‘The next outbreak? We are not ready’ या भाषणाचे मार्च २०१५ मध्ये आयोजन केले होते. जणू यामध्ये त्यांनी जगाला इशाराच दिला होता किंवा थेट भविष्यवाणीच म्हणूया की ‘येत्या काही दशकांत अनेक दशलक्ष लोक मृत्युमुखी पडले तर त्याचे कारण एकच ते म्हणजे संसर्गजन्य विषाणू हे असेल. कोणतेही क्षेपणास्त्रे नाहीत, तर सूक्ष्मजीव. लाखो लोक अणुबॉम्बने नव्हे, तर भयानक साथीच्या रोगाने मृत्युमुखी पडतील.’ त्यांनी त्याचं कारण असं दिलं की ‘आपण अण्वस्त्रे निवारणासाठी जेवढी गुंतवणूक केली, त्यापेक्षा फारच कमी गुंतवणूक साथीचे रोग थांबवणारी व्यवस्था निर्माण करण्यात केली आहे. तसं बघता आपल्याकडे महामारी थांबवण्यासाठी काहीच व्यवस्था नाही. हा अनुभव तुम्हाला इबोला साथीच्या काळात आला असेल. आपल्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञांची टीम नव्हती व आपण लोकांना इशारा देवू शकलो नाहीत. पण येणारी महामारी यापेक्षा कित्येक पट भयानक असेल. यात लाखो लोक मृत्युमुखी पडतील.’ 10

8या कार्यक्रमाच्या माध्यमातून बिल गेट्स हे येणाऱ्या आपत्तीसाठी जगाची मानसिकता तयार करत होते असं म्हणता येईल. मुळात आरोग्य व्यवस्था इतकी कमजोर ठेवायची की जास्तीत जास्त मृत्यू झाले पाहिजेत आणि मृत्यू होत आहेत म्हणून आरोग्य यंत्रणेला दोष देत राहायचं व आपलं ईप्सित कसं साध्य झालं याचा खाजगीत असुरी आनंद मिळवत राहायचा हे खरं त्यांचं ध्येय आहे. इबोलापेक्षा खतरनाक साथीचे रोग येत्या काही दशकांत येणार आहेत व त्यामुळे प्रचंड मनुष्यहानी होईल हे सांगणारा व्यक्ती कोणीही डॉक्टर अथवा शास्त्रज्ञ नसून एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे हेच किती भयंकर आहे! या कार्यक्रमामध्ये बिल गेट्स यांनी इबोला उद्रेकात काम करणाऱ्या स्वयंसेवकांना ‘वीर’ ही पदवी दिली होती. आज तसे साम्य आपल्याला ‘कोरोना वॉरिअर/ कोरोना योद्धा’ संबोधण्यात दिसते. मुळात ही अतिशयोक्ती तर आहेच, पण परिस्थिती काही गंभीर नाही. येणाऱ्या नवीन साथीच्या रोगाला त्यांनी जैवदहशतवाद (bioterrorism) असं म्हटलं. कोरोनाच्या बाबतीत चीनला अशाच प्रकारे जबाबदार धरले गेले आणि जनतेची दिशाभूल केली गेली. १९१८ मध्ये हवेतून पसरलेल्या ‘स्पॅनिश फ्लू’च्या साथीत तब्बल ३० दशलक्ष लोक मृयुमुखी पडले, याची भीती घालून येणारी महामारी तशीच असेल हे देखील ठसवले. अशा तर्कदुष्ट लोकांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतःचा अजेंडा रेटण्यासाठी केला आणि आपल्या ज्ञानाची बढाई मारणाऱ्या कित्येक डॉक्टर, संशोधक, तज्ज्ञ व शास्त्रज्ञांना याचा थांगपत्ताही लागत नाही हे मानवतेचं केवढं मोठं दुर्दैव..! पुढे ते म्हणतात की ‘ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आम्ही विविध औषधे व लसी तयार करू.’ आजचे वास्तव काय आहे? रेमडेसिवीरसारखी इंजेक्शन्स WHO ने कोरोनासारख्या आजारांवर वापरायला नाकारले 11 असूनही भारतात त्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्यांच्या किमती वाढवल्या जात आहेत व डॉक्टर्सकडून रुग्णांवर त्याचा वापर केला जात आहे. यामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे, तरीसुद्धा हे रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले असा धादांत खोटारडेपणा हलकट प्रसारमाध्यमे पसरवत आहेत. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार व वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचा मृत्यूदेखील रेमडेसिवीर दिल्यामुळे झाला. या कार्यक्रमात ते पुढे म्हणतात की ‘आपल्याला येणाऱ्या साथीच्या रोगांची रंगीत तालीम करावी लागेल, ज्याला आपण germ games (जर्म गेम्स) म्हणूया.’ या विधानाचा उल्लेख पुढील एका मुद्द्यामध्ये येणार आहे. यानंतरचे त्यांचे एक विधान अत्यंत बेजबाबदार व अशोभनीय आहे. “येणाऱ्या महामारींना तोंड देण्यासाठी ‘जागतिक आरोग्य संघटना’ जी आर्थिक मदत व गुंतवणूक करेल त्यामुळे जागतिक आरोग्यस्तर असंतुलित होईल आणि यामुळे जग आणखी न्याय्य व सुरक्षित होईल.” तसं बघितलं तर, अशा सैतानी विचारसरणीच्या लोकांकडून कोणतीही योग्य अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा सन 2007 मध्ये ‘जागतिक लोकसंख्या नियंत्रण’ याबद्दल ब्लॉग:

ब्रिटीश संसदेत खासदार म्हणून निवडून आलेले असतांना बोरिस जॉन्सन यांनी 2007 मध्ये आपल्या वेबसाईटवरील एका ब्लॉगमध्ये जागतिक लोकसंख्या व डीपॉप्युलेशन या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. ‘’अशी गोष्ट की सहसा त्यावर चर्चा होत नाही, ती म्हणजे मानवी प्रजननक्षमता. सर्वांना वाटते की ग्लोबल वॉर्मिंग हे एकमेव सर्वांत मोठे आव्हान आहे, परंतु ते दुसऱ्या स्थानी आहे. खरी समस्या आहे वाढती लोकसंख्या. जगभरात रोज २ लाख ११ हजार लोकांचा जन्म होतो आणि जर्मनीच्या लोकसंख्येएवढे लोक दरवर्षी जन्माला येतात. संयुक्त राष्ट्रांचा (UN) अहवाल असा आहे की 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या 900 कोटी झालेली असेल. आणि या गुंतागुंतीच्या होत जाणाऱ्या विषयावर कोणीच चर्चा करत नाहीये हे आश्चर्यजनक आहे..!” 12 जगभरातील इतर एलिट्सहून यांचेही म्हणणे काही वेगळे नाही. ते म्हणतात, “केवळ लोकसंख्या नियंत्रित करून आपण पृथ्वीला वाचवू शकतो.” यावर उपाय म्हणून ते पुढे स्पष्टीकरण देतात, “साक्षरता, स्त्री-मुक्ती चळवळ व संततिनियमन या सोयीसुविधा निर्माण करून आपण लोकसंख्यावाढ व वैश्विक दारिद्र्य कमी करू शकतो. फक्त राजकारण्यांनी यावर न बोलण्याचा भित्रेपणा सोडला पाहिजे व जो कळीचा मुद्दा आहे तो उचलून धरला पाहिजे.” जनतेने निवडून दिलेल्या, लोकशाही मार्गाने संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या या राजकारण्यांना आहे त्या परिस्थितीत जुन्या समस्या सोडवण्यापेक्षा भविष्यातील गरिबी कमी होईल त्यावर काम करण्यात स्वारस्य वाटते. निवडून येतात लोकलि, काम मात्र करतात ग्लोबलि…! One world government (संपूर्ण जगाचे एकमेव सरकार) स्थापण्यासाठी चाललेला हा त्यांचा आटापिटा कमी लोकसंख्येला सक्षमपणे ‘कंट्रोल’ करता येण्यासाठी आहे, त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. तिसऱ्या जगातील गरिबी कमी व्हावी असे त्यांना अजिबात वाटत नाही, उलट गरीब कमी व्हावेत हा त्यांचा खरा अजेंडा आहे. खोटी महामारी, कडक लॉकडाऊन, मास्क व लसीची निराधार सक्ती हे सर्व जनतेच्या सुरक्षिततेसाठी नव्हे, तर त्यांना हव्या तशा व्यवस्थेची निर्मिती करणे हे त्यांना अभिप्रेत आहे.

जगभरातील आजच्या अस्थिर परिस्थितीची नेमकी प्रेरणा- अजेंडा 21 किंवा अजेंडा २०३०:

14 जून 1992 रोजी ब्राझीलच्या रिओ दी जानिरोमध्ये संयुक्त राष्ट्रांची एक परिषद पार पडली. 21 व्या शतकासाठी अजेंडा असा त्या परिषदेचा विषय होता. त्यावरून अजेंडा 21 ही संकल्पना रूढ झाली. परिषदेच्या अधिकृत 351 पानी प्रसिद्धीपत्रकाच्या प्रस्तावनेमध्ये दिलेली माहिती अशी आहे. “आपल्या आरोग्यासाठी ज्या वातावरणावर आपण अवलंबून आहोत, तेथे वाढत चाललेली गरिबी, उपासमार, निरक्षरता, रोगराई यामुळे राष्ट्रा-राष्ट्रांत संघर्ष सुरु आहे. आपल्याला चांगले भविष्य हवे असेल तर शाश्वत विकासासाठी आपल्याला ‘जागतिक भागीदारी’ करावी लागेल. 13 या जागतिक भागीदारी शब्दात ‘एक वैश्विक सरकार’ बनवण्याची प्रेरणा आहे. अजेंडा 21 या संकल्पनेचे जे प्रणेते आहेत, त्यांनीच पृथ्वीवरील अखंड मानवी जीवनावर वरील समस्या लादल्या. 21 व्या शतकासाठी जगाला चांगली स्वप्ने दाखवणाऱ्या या षडयंत्रकारींनी शतकाच्या पहिल्याच वर्षी ११ सप्टेंबरला अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर भीषण दहशतवादी हल्ला घडवून आणला. यांच्या Sustainable Development या संज्ञेचा खरा अर्थ ‘एकछत्री नियंत्रण’ असा आहे.
अमेरिकेत फोरेन्सिक कमर्शिअल रिअल इस्टेट अप्रेझर म्हणून काम करणाऱ्या रोझा कोरी यांनी अजेंडा 21 चा बुरखा फाडणारे ‘बिहाइंड द ग्रीन मास्क, युनायटेड नेशन्स अजेंडा 21’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. २५ जून २०१२ यादिवशी न्यू हॅम्पशायर येथे याचे प्रेझेन्टेशन केले. 14 त्यात त्या म्हणतात की अजेंडा 21 हा पृथ्वीवरील संसाधने ताब्यात घेण्याचा आराखडा किंवा कृतीयोजना आहे. हे एक जागतिक नियोजन आहे, परंतु याची अंमलबजावणी स्थानिक स्तरावरून केली जाईल. ही संसाधने म्हणजे जमीन, पाणी, खनिजे, वनस्पती, प्राणी, बांधकामे, माहिती, उर्जास्त्रोत, उत्पादनाची सर्व साधने, सर्व माणसे. त्यांना एकप्रकारे शॅडो गव्हर्नमेंट वा पॅरलल गव्हर्नमेंटची उभारणी करायची आहे. यामुळे माणसांचे व्यक्तिगत व राष्ट्रीय स्तराचे खाजगी मालमत्ता हक्क, स्वातंत्र्य, व सार्वभौमत्व याला बाधा येईल. हा मानवी इतिहासातला सर्वांत मोठा प्रचारघोटाळा असेल. ही विनाशाची पाककृती आहे. स्मार्ट मीटरचा उपयोग करून मानवाच्या पाणी वापरावर निर्बंध आणले जातील. ही वैश्विक एकपक्षीय सत्ता व उद्योग-साम्राज्यांच्या नियंत्रणाची नांदी आहे. २०२१ ते २०३० यादरम्यान हे One World Government किंवा New World Order कडून अर्थशास्त्र, निवास, वाहतूक, जमीन वापर, आरोग्य, पाणी, ऊर्जास्त्रोत, अन्न, उत्पादन व लोकसंख्या नियंत्रण यावर ताबा मिळवला जाईल. रोडमॅप (अजेंडा ) २०३० या नावाने मे २०२१ मध्ये भारत व ब्रिटनची द्विपक्षीय चर्चा सुद्धा पार पडली आहे. 15

Event 201- कोविड-19 महामारीची रंगीत तालीम:

आपण ‘टेड’च्या कार्यक्रमातील बिल गेट्स यांची महामारीची रंगीत तालीम हा मुद्दा बघितला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ऑक्टोबर २०१९ रोजी न्यूयॉर्कच्या एका हॉटेलमध्ये एका काल्पनिक (?) महामारीची रंगीत तालीम/ एकप्रकारे युद्धसराव पार पडला. 16 येणाऱ्या महामारीमुळे ज्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व सामाजिक गंभीर परिणामांची निष्पत्ती होईल, त्यांना सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक व खाजगी व्यवस्थांना काय उपाययोजना कराव्या लागतील त्याचा आढावा घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि काय आश्चर्य..? नंतरच्या केवळ दोन महिन्यांत चीनच्या वूहानमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. याचा अर्थ, अशी कोणती तरी महामारी येणार आहे हे त्यांना अगोदरच माहित होतं असं तर नाही ना? की महामारीचे नियोजन त्यांचेच होते?
कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर अनेक षडयंत्र सिद्धांत संशोधकांनी Event 201 वर लक्ष केंद्रित केले आणि सर्वदूर याच कार्यक्रमाची चर्चा होऊ लागली. रंगीत तालिमीनंतर इतक्या कमी कालावधीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडणे तसेच याला ‘टेड’ सारख्या अनेक कार्यक्रमांची पार्श्वभूमी असणे असे खूप धागेदोरे जुळून आल्याने कोरोना ही महामारी नसून एक घातपात आहे हा संशय बळावू लागला. परिणामी, कोरोना प्रादुर्भावाच्या तब्बल एक ते दीड वर्षांनतर Event 201 च्या संकेतस्थळावर त्यांना रंगीत तालीम व कोरोना महामारी यावर जॉईन्ट स्टेटमेंट देणे भाग पडले. ज्यात त्यांनी सारवासारव केली की “कोरोना महामारी येणार आहे असा कोणताही इशारा आम्ही यातून दिला नव्हता. आम्ही फक्त काल्पनिक (?) कोरोना व्हायरसचे मॉडेल तयार केले. कोरोनामुळे 65 दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतील असे कोणतेही भाकीत आम्ही केले नव्हते. आम्ही ज्या कोरोना व्हायरसचा युद्धसराव केला होता, त्यामध्ये आणि कोविड-19 मध्ये अजिबात साम्य नाही.” 17

कोरोना व्हॅक्सिन की डीपॉप्युलेशन व्हॅक्सिन?:

पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ व इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चे माजी प्रमुख डॉ. के. के. अगरवाल यांचे १७ मे २०२१ रोजी कोरोना संक्रमणामुळे निधन झाले. २८ एप्रिल रोजी त्यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून कळवले होते की कोविड-19 व्हॅक्सिनचे दोन डोस घेतल्यावर त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. 18 (कदाचित त्यांचं हे ट्वीट लवकरच डिलीट केलं जाईल.) तत्पूर्वी, ते या लसीबाबत जनतेमध्ये जागृती करत होते की कोरोना व्हॅक्सिन ही पूर्णपणे सुरक्षित आहे व यामुळे नंतर कोरोना संक्रमणाचा धोका कमी होतो. त्यांच्या मृत्यूची बातमी तुरळक न्यूज चॅनल्सवर प्रकाशित झाली, पण त्यातही हेच लिहिलं होतं की डॉ. अगरवाल यांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे (लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोना झाला हे लपवून ठेवले गेले.). याचाच अर्थ, प्रसारमाध्यमे हेतुपुरस्सरपणे जनतेपासून काहीतरी लपवत आहेत व दिशाभूल करीत आहेत हे स्पष्ट होते. भारतात कोरोना व्हॅक्सिन घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांची संख्या आता १०७९ वर पोहचलीय (स्त्रोत: ट्विटर/ अधिकृत माहिती नाही). दुर्दैवाने, हे कोणत्याही सरकारी अथवा खाजगी न्यूज चॅनलवर अजूनपर्यंत दाखवण्यात आलेलं नाही. म्हणून आजची प्रसारमाध्यमे हीच खरी आपली वैरी आहेत.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांचे साटेलोटे:

उद्योगपती अदार पूनावाला यांच्या पुणेस्थित Serum Institute of India (SII) ला ‘बिल गेट्स अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये ‘कोविशिल्ड’ लसीच्या निर्मितीसाठी 4 दशलक्ष डॉलर्सचं अनुदान दिलं आहे. 19

टायफॉईडसारख्या आजारांवर उपाय म्हणून कमीत कमी किमतीत लस तयार व्हावी यासाठी ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये हैद्राबादच्या ‘भारत बायोटेक’ या कंपनीला देखील अनुदान दिले आहे. 20 टायफॉईड ही विश्वव्यापी साथ नसल्याने याठिकाणी तो मुद्दा ग्राह्य नाही. पण येथे उल्लेख करण्याचा उद्देश हा की या जैवतंत्रज्ञान कंपन्यांना बिल गेट्स हेच फंडिंग करीत आहेत, ज्यांचा उद्देश लोकांना आजारातून बरे करण्यासाठी लसनिर्मिती हा नसून, लोकसंख्या कमी करणे हा आहे.

महत्त्वाची निरीक्षणे; तसेच या गोंधळाच्या परिस्थितीवर उपाय काय?

1. न्यूज चॅनल व वृत्तपत्रे हेच खरे व्हायरस आहेत. लोकांपर्यंत खोट्या बातम्या पसरवत आहेत. त्यांना ताळ्यावर आणण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे ‘बघणे पूर्णपणे बंद करणे’. टीव्ही बंद केल्यावर आजूबाजूला निरीक्षण केल्यास लक्षात येईल की ही महामारी खरंतर मीडियाचा इव्हेंट आहे.

2. माझ्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पुरस्कार व सरकारच्या दडपशाहीच्या निषेधार्थ मी गेल्या वर्षभरापासून अजिबात मास्क वापरत नाही. (मला तरीही कोरोना झालेला नाही, कारण टेस्ट केल्याशिवाय कोरोनाचे निदान होत नाही.) कारण ‘एम्स’चे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात, “कोरोनाला घाबरण्याचं काहीही कारण नाही, हा साधारण सर्दी-ताप आहे.” 21 (या विधानात त्यांनी अनेकदा घूमजाव केले आहे.)

3. कोरोनाची कोणतीही लस घेणे अजिबात बंधनकारक नाही. होय, हे अगदी खरं आहे! भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. 22 याशिवाय स्तनपान देणाऱ्या महिला, गरोदर महिला आणि दीर्घकाळ आजारी असणाऱ्या लोकांनी कोरोनाची लस घेवू नये असंही सरकार म्हणतं. (न्यूजच्या प्रचाराला बळी पडू नका- प्रथितयश डॉक्टर व तज्ज्ञ न्यूज चॅनलच्या ‘प्राईम टाईम’ सारख्या कार्यक्रमात येऊन, ‘सर्वांनी लस घ्या’ असं बिनधास्त सांगत आहेत, पण ते सरकारच्या गाईडलाईन्सशी पूर्णपणे विसंगत आहे.)

4. भारतात कोविडच्या लसीविरुद्ध जनजागृती करणाऱ्या काही डॉक्टर्सची एनडीटीव्ही व इतर चॅनल्सनी त्याचबरोबर ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने बदनामी केली. पण युरोपमधील डेन्मार्क या देशात लोकांनी ‘एस्ट्राझेनेका’ या कंपनीची लस घेतल्यावर काही लोकांच्या शरीरात रक्ताच्या गाठी होत आहेत असं आढळून आल्याने त्या देशाने तात्काळ लसीकरण कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. 23 पण ही न्यूज मात्र स्वतःला तथाकथित पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या भारतीय चॅनल्सनी दाखवलीच नाही. तात्पर्य, लस तुम्हाला कोरोना संक्रमण होण्यापासून रोखेल हे विश्वासार्ह नाही.

5. अमेरिकेतील फ्रंटलाईन डॉक्टर जेफ्री बार्क (MD) यांनी कॅनडामधील पोषणतज्ज्ञ कमलप्रीत सिंग यांच्याशी केलेल्या चर्चेत सांगितले, “कोरोनाची लस ही प्रयोगात्मक लस आहे आणि तिची कोणतीही सुरक्षितता चाचणी केलेली नाही, ज्यामुळे अनेक प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते. 24 आता अशी लस घ्यायची की नाही हे सर्वथा आपल्या सद्सद्विवेकबुद्धीवर अवलंबून आहे.

6. मास्क लावला आणि ६ फुटांचे अंतर पाळले तर लॉकडाऊनची काय गरज? तरीही सरकार वर्षभरापासून जनतेच्या जगण्याचा अजिबात विचार न करता टाळे लावत आहे. या मनमानीला विरोध म्हणून सर्वांनी सरकारच्या विरोधात प्रखर आंदोलन उभं करण्याची गरज आहे.

7. जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे डायरेक्टर जनरल तेद्रोस अदनोम हे अगोदर इथिओपियामधील एका अंतर्गत दहशतवादी संघटनेचे (टीग्रे लिबरेशन फ्रंट) प्रमुख होते. हे ‘विकिपीडिया’वर नमूद केलेले होते, परंतु कोविड महामारी पसरल्यानंतर तेद्रोस व त्यांचे दहशतवादी कार्य षडयंत्र सिद्धांत अभ्यासकांनी जगासमोर आणले की एक दहशतवादी व्यक्ती जगातील सर्वोच्च संघटनांपैकी एक असलेल्या संघटनेच्या प्रमुखपदी विराजमान आहे. नंतर, त्यांच्या दहशतवादी संघटनेच्या सहभागाविषयीचा उल्लेख विकिपीडियामधून वगळण्यात आला. याचा अर्थ, आपल्या आरोग्याची काळजी (?) वाहणारा एक ताकदवान माणूस डॉक्टर नसून जसा सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, अगदी तशीच गत या व्यक्तीची सुद्धा आहे. आपण साध्यासरळ दृष्टीने यांना बघतोय, ते चूक आहे. आपण कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता स्वतः रिसर्च करून योग्य तो निर्णय घ्यावा.

8. आंतरराष्ट्रीय सहकार्याने, खरं तर संगनमताने जसे हे सार्वजनिक क्षेत्रातले लोक आपल्या आरोग्याबाबतची धोरणे ठरवत आहेत; अगदी तसंच उदाहरण फायजर (Pfizer) या खाजगी औषधनिर्माती कंपनीचं देता येईल. अमेरिकेत कोविडची लस तयार करणारी कंपनी ‘फायजर’चे चेअरमन व सीईओ अल्बर्ट बर्ला हे चक्क जनावरांचे डॉक्टर आहेत. (Doctor of Veterinary Medicine) 25 आता बोला! यावर हसावे की रडावे हेच कळत नाही पण प्रत्यक्षात हे खूप चिंताजनक आहे. हे लोक आपल्यासाठी लस तयार करत आहेत आणि याची आपल्याला काहीच माहिती नाही. याविरुद्ध एकत्र येवून आपण जागरूक झाले पाहिजे व सत्य माहितीचे आदानप्रदान केलं पाहिजे.

9. गेल्या वर्षी ‘टेस्ला’ या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे संस्थापक एलन मस्क यांनी कोरोनाच्या रॅपिड अँटिजेन टेस्टच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते कारण एकाच नमुन्यावर त्यांना वेगळे रिझल्ट्स मिळाले होते. याव्यतिरिक्त, नोबेल पारितोषिक विजेते व अमेरिकन बायोकेमिस्ट डॉ. केरी मलीस यांनी ज्या RTPCR चाचणीचा शोध लावला, त्यांच्या म्हणण्यानुसार ही चाचणी कोणत्याही रोगाच्या निदानासाठी उपयुक्त नाही कारण ती प्रत्येकवेळी वेगळेवेगळे रिझल्ट्स दाखवू शकते. (२६) २०१९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. (घातपात?) तरीही हॉस्पिटल्समध्ये ही खोटी टेस्ट बिनदिक्कतपणे केली जात आहे. (fact check नावाचं सध्या पेव फुटलंय, त्यात शेकडो प्रतिष्ठित संस्थांनी डॉ. केरी मलीस यांच्याच विधानाचा विपर्यास करून त्यांना चुकीचे ठरवले आहे. या तथाकथित संस्थांची माहिती आपण विश्वासार्ह मानायची की नाही हेही पूर्णपणे आपलं स्वातंत्र्य आहे.)

संदर्भ:

  1. Prince Philip gaffe: What was the shock joke made about deadly viruses?
https://www.express.co.uk/news/royal/1250395/prince-philip-latest-coronavirus-uk-royal-family-news-Prince-Philip-quotes-jokes-virus
  1. 9. With vaccines, Bill Gates changes the world again.
https://www.forbes.com/sites/matthewherper/2011/11/02/the-second-coming-of-bill-gates/
  1. Doctor who? Who’s the world’s most powerful doctor?
https://www.thesun.co.uk/news/14769154/worlds-most-powerful-doctor/
  1. 5. 6. Meet the world’s most powerful doctor: Bill Gates
https://www.politico.eu/article/bill-gates-who-most-powerful-doctor/
  1. Anti-lockdown protesters march from St James Park to BBC HQ in London
https://uk.news.yahoo.com/anti-lockdown-protesters-march-st-110000448.html
  1. Post corornavirus, a new world order will emerge & India will be a strong player on world stage: PM

https://youtu.be/jBvfHQLhKIM
https://www.narendramodi.in/text-of-pm-s-reply-to-the-motion-of-thanks-on-the-president-s-address-in-lok-sabha-553882

  1. Bill Gates: The Next Outbreak? We are not ready.
  1. WHO recommends against the use of remdesivir in Covid-19 patients
https://www.who.int/news-room/feature-stories/detail/who-recommends-against-the-use-of-remdesivir-in-covid-19-patients
  1. Global population control: Boris Johnson
https://www.boris-johnson.com/2007/10/25/global-population-control/
  1. Agenda 21: Sustainable Development
https://sustainabledevelopment.un.org/outcomedocuments/agenda21
  1. Rosa Koire, Behind The Green Mask, Agenda 21
  1. Roadmap 2030 for India – UK future relations
https://mea.gov.in/bilateral-documents.htm?dtl/33838/Roadmap+2030+for+IndiaUK+future+relations+launched+during+IndiaUK+Virtual+Summit+4+May+2021
  1. Event 201: A pandemic exercise to illustrate preparedness efforts
https://www.centerforhealthsecurity.org/event201/
  1. Statement about nCov and our pandemic exercise
https://www.centerforhealthsecurity.org/news/center-news/2020/2020-01-24-Statement-of-Clarification-Event201.html
  1. Dr. K. K. Aggarwal Twitter handle (now handled by HCFI & Medtalks)
  1. Serum Institute of India – Bill & Melinda Gates Foundation
https://www.gatesfoundation.org/about/committed-grants/2020/10/inv021423
  1. Bharat Biotech International Ltd. – Bill & Melinda Gates Foundation
https://www.gatesfoundation.org/about/committed-grants/2019/11/inv003491
  1. Covid-19 is a mild disease, no need to panic.
https://www.aninews.in/news/national/general-news/covid-19-is-a-mild-disease-no-need-to-panic-aiims-director-dr-randeep-guleria20210425173550/
  1. Covid-19 Vaccine FAQs: Ministry of Health and Family Welfare
https://www.mohfw.gov.in/covid_vaccination/vaccination/faqs.html#who-will-get-the-vaccine
  1. Denmark says it’s permanently stopping use of the AstraZeneca vaccine
  1. Dr. Jeffrey Barke, MD (American Frontline Doctors) says, “I will not take the vaccine”. It is an experimental vaccine with no safety testing and carries risk of high potential adverse effects.

https://www.facebook.com/1306136933/videos/10226352895351177/
https://gosatvik.ca/experts/

  1. Pfizer CEO and Chairman Albert Bourla, DVM, PhD
https://www.pfizer.com/people/leadership/executives/albert_bourla-dvm-phd
  1. Questioning unreliable PCR testing is hardly trivial
https://www.rcreader.com/commentary/questioning-unreliable-pcr-testing-is-hardly-trivial

We would love to hear your thoughts on this